जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा 26 हजार पार गेला आहे. त्यात कोरोनाबरोबर आता ’सारी’ ची देखील चिंता वाढली आहे. सारी चे आतापर्यंत 551 रुग्ण आढळून आले आहे. तर आतापर्यंत 17 रुग्णांचे सारी ने बळी घेतले आहेत.
एकीकडे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाहिली तर 26465 वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. त्यातच कोरोनाबरोबर सारी आजाराची देखील तपासणी केली जात आहे. त्यामुळे सारीचे देखील रुग्ण समोर येत आहेत. यापूर्वी देखील सारी आजाराचे रुग्ण समोर येत होते. परंतु त्याची नोंद फारशी केली जात नव्हती आता कोरोनामुळे सारीची नोंद व्हायला लागली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या देखील समोर येत आहेत. सारीचा 31 तारखेपर्यंत अहवाल पाहिला तर 1 हजार 438 जणांची सारी तपासणी करण्यासाठी स्वब घेतले होते. त्यापैकी 551 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
881 जणांचे अहवाल निगेटिव्ह
कोरोना आजाराने जिल्ह्याभरात हाहाकार घातला आहे. त्यामुळे चिंता वाढताना दिसत आहे. त्यातच सारीची चिंता वाढली आहे. आतापर्यंत 31 ऑगस्ट पर्यत करण्यात आलेल्या सारी च्या तपासणी अहवालानुसार 551 सारीचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे चिंता आणखी वाढली. असे असले तरी 881 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत सारीचे 17 बळी
एकीकडे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण प्रतिदिन वाढताना दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 759 रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे चिंता वाढताना दिसत आहे. मात्र यातुलनेत सारीचे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. आतापर्यंत सारीमुळे 17 रुग्णांचे बळी गेले आहेत.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये
प्रतिदिन कोरोनाचे तीनशेहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यात सारी चे देखील रुग्ण समोर येत आहेत. प्रतिदिन सारी आजाराची देखील तपासणी केली जात आहेत. त्यात 1 रुग्ण तरी सारीचे समोर येत आहेत. त्यामुळे चिंता वाढत चालली आहे. असे असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सारी हा आजार नसून एक लक्षणांचा समूह आहे. त्यापासून सावध राहण्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. कोरोना आणि सारी या पासून सावधानता बाळगण्यासाठी नागरिकांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे. लक्षणे आढळून आल्यास घाबरून न जाता वेळीच उपचार घेतले पाहिजे.